अभियानांतर्गत सदस्य शाळांमध्ये नोंदणीकृत स्वयंसेवकांनी खालील कार्यक्रम आयोजित होतील याचा विचार करावा. प्रबोधन वाचन – माला अभियानाच्या माध्यमातून वर्षातून किमान तीन वेळा शाळेत कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे.

पहिली पायरी

एक छानसे सादरीकरण,भाषिक खेळ व पुस्तकांच्या यादीचे वितरण / प्रसार

दुसरी पायरी

अभिवाचन किंवा सादरीकरण ( कथा, कविता स्पर्धा इत्यादी)

तिसरी पायरी

विभागीय संमेलन, त्यासाठी आवाहन, काही पूर्वतयारी कार्यक्रम

शाळास्तरावर घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचे विभागस्तरीय एक संमेलन भरवावे. त्या विभागीय संमेलनात सहभागी शाळा, पालक आणि विद्यार्थी यांना सादरीकरणाची यथोचित संधी द्यावी.